Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

सन्मान महिलांचा

कवटाळूनी छातीशी मज
आपुल्या दुधाने वाढविले
पहिली महिला आई माझी
जिने जग मज दाखविले
वंदन करूया नारीशक्तीला
जिने जगाला प्रेम शिकविले

सोबत राहूनी लाड केले
घास मुखीचे मला भरवीले
दुसरी महिला बहीण माझी
जिने मला सांभाळीले
वंदन करूया नारीशक्तीला
जिने जगाला प्रेम शिकविले

अज्ञान रुपी अंधारातून
उजेडात मज आणीले
तिसरी महिला शिक्षिका माझी
जिने मला शिकविले
वंदन करूया नारीशक्तीला
जिने जगाला प्रेम शिकविले

खंबीरपणे उभी राहिली
अडचणीत मज साह्य केले
चवथी महिला मैत्रीण माझी
जिने मला सहकार्य केले
वंदन करूया नारीशक्तीला
जिने जगाला प्रेम शिकविले

आयुष्यात सहयोग केले
सुखदुःखात साथ दिले
पाचवी महिला पत्नी माझी
जिने मला प्रेम दिले
वंदन करूया नारीशक्तीला
जिने जगाला प्रेम शिकविले

स्वभावाला शांत केले
ज्या-ज्यावेळी मन कठोर झाले
सहावी महिला मुलगी माझी
जिने जगण्यास भाग पाडले
वंदन करूया नारीशक्तीला
जिने जगाला प्रेम शिकविले

ह्दयात सामावून घेणार
जेव्हा जगात मी नसणार
सातवी धरणी माता माझी
जिने मजला कुशीत घेतले..
वंदन करूया नारीशक्तीला
जिने जगाला प्रेम शिकविले


आजी आत्या काकू मामी
भिन्न नावे नात्यांची
सर्वांतुन ही एकच वाहे
गंगा वात्सल्य प्रेमाची

पुरूष असाल तर प्रत्येक नारीचा सन्मान करा आणि
स्त्री असाल तर यातील एक असल्याचा अभिमान बाळगा

जागतिक महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.