कधी समजेल
कधी समजेल तुला
माझ्या निस्वार्थ प्रेमाचा अर्थ
कधी उमगेल तुला
माझ्या गहिरया प्रेमाचा रंग
कधी जाणवेल तुला
माझ्या मनातील फुलांचा सुगंध
कधी उलगडेल तुला
लडिवाळ प्रेमाचा रेशीम बंध
कधी वाटे तू फूल
मी तुझा सुगंध
कधी भासे तू अथांग जलाशय
मी हळूवार एक तरंग
कधी तू कोसळणारा पाऊस
मी अबोल एक तुषार
कधी तू उंच वृक्ष देवदार
मी बहरून गुरफटलेली वेल
भिजून जावे प्रेमात तुझ्या
ओलेचिंब अंतरंग आकंठ
हरवून जावे घट्ट तुझ्या मिठीत
उरावा एकच देह एकच श्वास
तेव्हा तुला जाणवेलनारे अंतरीची हाक
घेशीलनारे जन्मोजन्मी मिलनाची आणभाक
विनया वाळिंबे, कामोठे
Be First to Comment