सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा #
पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे
क्षितिजावरती सप्तरंगाचे सुरेख तोरण मनी भासे,
पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे
शितलवारा पाऊसधारा खुळून गेला आसमंत सारा,
ऊन कधी पाऊस कधी लपाछपीचा खेळ असे
पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे
सरसर सरी वरून बरसतील
फूल कळ्या माती चिंब भिजतील
हिरवा शालु नेसून धरणी नववधू भासे
पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे
फुले फुलती, पक्षी गाती, पिके डोलती शेतात
तुडुंब वाहून नद्या नाले गाऊनी गाणे खळखळते
पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे
मास असे हा सणासुदीचा ,
चराचराच्या समृद्धीचा
तहानलेल्या मनामनाला तृप्त करूनी हर्ष देतसे
पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४

Be First to Comment