सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा
टिळक होते ठळक
आगळी - वेगळी त्यांची ओळख
डोक्यावर पगडी नजरेत झलक
'स्पष्टोक्तेपणा' चे बोलण ठळक
नाव त्यांचे बाळ गंगाधर टिळक...१.
समाजोन्नतीचे धोरण धमन्यांत
जनजागृतीचे तोरण घराघरात
सुविचारांचे भाषण जनमनात
प्रतिज्ञांचे स्मरण मन-मंदिरात...२.
स्वराज्यासाठी प्रतिज्ञा केली
वृत्तपत्रांतून विचार पोहोचविले
एकोप्यासाठी कल्पना सुचली
जयंत्या-गणेशोत्सव सुरू केले...३.
युगपुरुष थोर समाजसुधारक गुण
तयांचे स्मरावे - आचरावे
शिकवणुकीचे धडे गिरवावे
करता येईल ते चांगले करावे...४.
©® कविश्री- अरूण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, मो.-9987992519.






Be First to Comment