लो.टिळक वंदना
वंदन तुज लोकमान्य टिळक भास्करा|
स्फूर्ती देई तू अम्हास ज्ञानसागरा ||१||
स्वराज्य जन्मसिद्ध हक्क आमुचा असे |
ऐकताच इंग्रजांस लागले पिसे |
केसरीमधून सिंहनाद गर्जला ||१||
पारतंत्र्य घनतिमिरी देश झोपला |
शिव-गणेश उत्सवीं अभिमान जागला |
साहिल्या असह्य यातना धुरंधरा ||२||
गीतेचे ते रहस्य तूच जाणिले |
ओरायन आदि ग्रंथ तूच निर्मिले |
धन्य धन्य भरतभूमि धन्य तू खरा ||३||
मनोहर काजरेकर, जांभवडे, ता. कुडाळ






Be First to Comment