Press "Enter" to skip to content

दि.बा. आगरी-घोषवाक्य कविता

“दि.बा.नावाचा- देवमानूस !!”


१. दि.बा. नावाचा ‘जलम झाला’ जया —
जासय गाव ‘पुन्यवान ठरला’ तया !!
२. दि.बा. नावाचा ‘आवाज’ जया —
समाज-ताकतीचा ‘साज’ तया !!
३. दि.बा. नावाचा ‘भासन्’ जया —
बिनचूक सबुद ‘ठासून’ तया !!
४. दि.बा. नावाची ‘साखली’ जया —
समाज-येकता ‘दिसली’ तया !!
५. दि.बा. नावाची ‘मशाल’ जया —
नय शिजं ईरोदाची ‘डाल’ तया !!
६. दि.बा. नावाचा ‘चट्टान’ जया —
वादला घोंगवाला ‘भितांन’ तया !!
७. दि.बा. नावाचा ‘खरेपना’ जया —
उगरा परतं ‘खोट्पना’ तया !!
८. दि.बा. नावाचा ‘आब्ब्यास’ जया —
समाज-ईकास ‘हामकास’ तया !!
९. दि.बा. नावाचा ‘आंदोलन’ जया —
भूमिपुतर लढला ‘जिद्दीन’ तया !!
१०. दि.बा. नावाचं पास ‘कायदं’ जया —
सारे ज्यंन्तला झालं ‘फायदं’ तया !!
११. दि.बा. नावाची ‘पाटी दिसल्’ जया —
नईउंबय ईवानतल ‘वसल्’ तया !!
१२. दि.बा. नावाचा ‘आबिमान’ जया —
वारल् जाती-मातीची ‘शान’ तया !!
१३. दि.बा. नावाचा ‘देवमानूस’ जया —
डोकवं आशीर्वाद ‘भरगोस’ तया !!!

©®कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.
जासई- मो. 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.