आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत कोकण शिक्षक मतदारसंघातील महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचा शिक्षकसंवाद दौरा
सिटी बेल | रायगड |
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने महाड,पोलादपूर,म्हसळा,श्रीवर्धन येथे शिक्षक सहविचार सभा आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी सर्व शिक्षक बांधवांच्या समस्या ऐकून त्या कोणत्या पद्धतीने सोडविता येतील यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे तो लवकरात लवकर मोडीत काढू असे आश्वासित केले. तसेच संघटनेद्वारे विविध प्रलंबित विषय एकत्रित पणे मार्गी लावू असे आश्वासन दिले.
या दरम्यान ज्या तालुक्यांत शिक्षक संवाद सभा झाली तिथे आमदार निधीतून शाळांना लाभ मिळाला आहे की नाही याची माहिती घेतली असता जवळपास सर्व शाळांनी आभार मानत आपल्या आमदार निधीतून दरवर्षी आम्हांस शैक्षणिक साहित्य मिळते अशी पुष्टी दिली. शिक्षकवर्गाकडून भरभरून मिळणारा हा प्रतिसाद निश्चितच प्रोत्साहन देणारा ठरला.













Be First to Comment