मातोश्रींचा अखेरचा श्वास असलेले ठिकाण आमच्यासाठी स्मारक – जिल्हाप्रमुख शिरीष घरत
पनवेल तालुक्यातील शेडूंग याठिकाणी जिल्हास्तरीय शिवसैनिक नतमस्तक…
माँसाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची हजेरी…!
सिटी बेल | पनवेल |
आज पनवेल तालुक्यातील शेडू॑ग याठिकाणी मातोश्रींनी अखेरचा श्वास घेतला होता, त्याठिकाणी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या माध्यमातून स्व.मीनाताई ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाचा उद्घाटन सोहळा ममता दिनाच्या निमित्ताने जिल्हाप्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, माजी जिल्हाप्रमुख माधव भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखंड भारतातून त्यांना अभिवादन करण्यात येत असते. ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत ते मातोश्री म्हणजे कोणते मातृत्व हे जगासमोर ठेवत असते मात्र अखंड महाराष्ट्रातील जनतेला मातोश्री म्हणजे काय हे वेगळे सांगण्याची गरज पडत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या झंजावातात मातोश्री मीनाताई ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता. जर बाळासाहेब हे तोफगोळा असतील तर मीनाताई ह्या तोफ होत्या, जर बाळासाहेब हे तलवार असतील तर मीनाताई ह्या ढाल होत्या अशी व्याख्या बनण्यास वेळ लागणार नाही. शिवसेना घडवण्यात मीनाताईंनी वेळोवेळी आपले सामर्थ्य दाखविल्याचे अनेक संदर्भ इतिहासात कोरले आहेत. शिवसैनिकांची माय म्हणून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पेलल्या आणि झेलल्या देखील. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या घोडदौडीत त्यांनी बाळासाहेबांपेक्षाही शिवसैनिकांची काळजी अधिक घेतली, आणि म्हणूनच कट्टर शिवसैनिकांनी त्यांना आईचा दर्जा दिला. आजही संपूर्ण रायगड जिल्हास्तरीय शिवसेनेचे नेते पनवेल तालुक्यातील शेडुंग याठिकाणी पोहोचले आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले. – शिरीष घरत, शिवसेना जिल्हाप्रमुख
यावेळी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी आमदार व जिल्हाप्रमुख उरण मनोहरशेठ भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक माधव भिडे, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, सल्लागार रमेश गुडेकर, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, पनवेल तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, पनवेल ग्रामीण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, तालुका प्रमुख उरण रघुनाथ पाटील, उप तालुका प्रमुख विष्णू लहाने, नरेश पाटील, उप महानगरप्रमुख दीपक घरत, रामदास गोंधळी, कळंबोली शहर प्रमुख डी.एन.मिश्रा, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, शहर संघटक प्रवीण जाधव, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, सूर्यकांत म्हसकर, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, तालुका अधिकारी केवळ माळी, भिंगार शाखाप्रमुख संदीप घोगरे, प्रकाश पाटील, प्रितम घोगरे, अनिल फडके, रुपेश शेंद्रे, दिलीप घोगरे, मारुती म्हात्रे, दिलीप पाटील, कैलास पाटील, प्रतीक पाटील, धनाजी घोगरे, ज्ञानेश्वर पाटील, निलेश शेंद्रे, राम माळी, लक्ष्मण पाटील, काना घरत, कृष्णा शेंद्रे, सुमित दास, महेंद्र पाटील, किरण पाटील, संदीप तांडेल, नरेश भगत, महिला आघाडीच्या रायगड उपजिल्हा संघटीका सौ. कल्पना पाटील, विधानसभा संघटीका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटीका सौ. प्रमिला कुरघोडे, ग्रामीण तालुका संघटीका सौ. अनिता डांगरकर, नवीन पनवेल शहर संघटीका अपूर्वा प्रभु, पनवेल शहर संघटीका सौ. अर्चना कुलकर्णी, शिवसेना उपतालूका प्रमुख सौ. संगिता संजय भंडारकर, गुळसुंदे विभाग प्रमुख सौ.नूतन रमाकांत पाटील, उपसरपंच वावेघर शिवसेना सौ. श्रुती ज्ञानेश्वर माळी आदींसह शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
Be First to Comment