जुगलबंदी
मंडळी….
गोष्ट ही अलीकडची
कार्यक्रम ठरवला ‘जुगलबंदी’
गायनात आली रागदारी
रंगून गेले त्यात रसिकजनी
वाद्येही बोलू लागली
लई हुरूप बघा त्यामंदी
नृत्यातली जुगलबंदी
डोलत राहिलो आम्ही आयोजकही
अहो पन निवेदनातली जुगलबंदी
ऐकली होती का आधी तुम्ही ?
हिंदी, मराठीतील चढाओढी
अंग्रेजीही ठमकत आली
नाटकाचा तर रंगच न्यारा
सुचला उत्तम लेखिकेला
नोटबंदीचा विषय घेऊनी
नव्या – जुन्या नोटा आल्या पदर खोचुनी
कार्यक्रम तर छानच झाला
कौतुकाचा घातला सर्वांनी सडा
अहो मग काय….
अंतरमनही लगेच आले
विचारांशी जुंपू लागले
म्हने तुमचे कौतुक किती जनांना बघविले?
विचार कराया भाग पाडिले
आयुष्यातली ही जुगलबंदी
रे मानवा हरवली कुठं तुझी मानुसकी ती?
परमेश्वराला साद घातली
म्हंटलं… असं रे कसं तुझ्या राज्यामंदी?
हळुच हसला तो गालामंदी
नजरेतूनच उत्तर दिले त्यानी
वंदन करूनी मग परमेश्वरा हया
म्हंटलं विसवास हाय मज तुझ्या जादुमंदी!
फक्त तुझ्याच जादुमंदी!
नृपाली जोशी, नवीन पनवेल
९८२२३३०४४८






Be First to Comment