Press "Enter" to skip to content

वाचा नंदकुमार मरवडे यांची कोरोनावर समाज प्रबोधनपर कविता..

सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा

राया नका जाऊ बाजारी

नेहमीच राया तुमची घाई
नका लावू आता बोलायला
नका जाऊ तुम्ही बाजाराला
नका जाऊ तुम्ही बाजाराला ||ध्रु ||

अहो राया तुम्ही
नका जाऊ बाजारी |
बाजारात गर्दी, होईल सर्दी
मग येईल कशी कोरोनाची वर्दी || १ ||

नसे जरी पैसाअडका
खाऊ मिठ भाकर |
उपाशीपोटी राहून
पाणी पिऊन देऊ ढेकर || २ ||

आजचे काम उद्या होईल
करू नका आता मस्करी |
घरीच राहू या सुरक्षित
कोरोनाचा भूत येईल माघारी || ३ ||

सुखी आपल्या संसाराला
कोरोनाची नका लावू नजर |
मुलंबाळं आपली गोजिरवाणी
तयांना देऊ नका अंतर || ४ ||

*श्री.नंदकुमार मरवडे*, *श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी*, *ता.रोहा, जि.रायगड*. ★★★★★★★★

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.