Press "Enter" to skip to content

इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर आयोजित आय.एस.बी.एन.संमेलन

“अण्णा नाईक” यांच्या भूमिकेतील अभिनेता माधव अभ्यंकर यांच्याहस्ते होणार विविध पुरस्काराचे वितरण

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कला,साहित्य, सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन, विविध क्षेत्रात आपल्या कृतिशील कार्यातून प्रतिमा निर्माण करून समाजाला दिशा देण्याचे व असामान्य अलौकिक कार्य करणाऱ्या कार्यवीरांचा रविवार दि.26 डिसेंबर 2021 रोजी राजश्री शाहू स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर येथे झी मराठी टीव्हीवरील राञीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईक यांच्या भूमिकेतील अभिनेता माधव अभ्यंकर यांच्याहस्ते विविध पुरस्काराचे वितरण होणार आहे.

या कार्यक्रमात देश-विदेशात तीन महनीय व्यक्तींच्या सह्यांचा संग्रह त्याचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. निमंत्रित कवींचे कवी संमेलन पुस्तक प्रकाशन व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था व व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.

तरी साहित्यासह आपले नाव समृद्धी प्रकाशन, सिंधुदुर्ग 9421189821, 9359337468 यावर दि. 15 डिसेंबरपर्यंत पाठवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.यासाठी सहयोगी संस्था गोवा महाराष्ट्र येथील म्हणून आयोजन सत्रात सहभागी होणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.