Press "Enter" to skip to content

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची रायगड जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

नविन शेवा गावातील ३३ हेक्टर जमिनीचा प्रश्न येत्या एका महिन्यात सोडविण्याचे जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आश्वासन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू – विठ्ठल ममताबादे |

माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या बरोबर काल बैठक घेऊन पुनर्वसित नवीन शेवा या गावातील ३३ हेक्टर जमिनीचा प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. या वेळी त्यांनी येत्या एका महिन्यात हा प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असून, लगेचच समधित अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच गावठाण विस्तारांसाठी लागणारा निधी या विषयांवर जेएनपीटी चे प्रशासन, सिडको अधिकारी यांच्याशी बोलणी करून लवकरच तोडगा काढून वरील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी उरण पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, सल्लागार चंद्रकांत घरत, नवीन शेवा सरपंच आदिनाथ भोईर, ग्रामसुधारणा मंडळाचे अधक्ष कमलाकर पाटील, सहखजिनदार भगवान घरत, तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत म्हात्रे, शाखाप्रमुख शैलेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत, पी डी घरत, रमेश कोळी, अमित भगत व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.