Press "Enter" to skip to content

राहुल गांधी जे जे बोलले ते ते सगळे खरे होेते – महेंद्र घरत

पहा शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढ्याच्या विजयावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची प्रतिक्रिया

सिटी बेल | पनवेल |

अहंकारी पद्धतीने देशावरती कायदे लादू पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारला अखेर माघार घेत कृषी कायदे परत घ्यावे लागले. याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची ही नांदी आहे येथून त्यांची पडझड होण्यास सुरुवात झालेली आहे. आज अनेक दिग्गज व स्वतःला निष्ठावान म्हणवणारे भाजप नेते त्यांची साथ सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.

महेंद्र घरत पुढे म्हणाले की, आमचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी भाजप सरकारला हे कायदे मागे घ्यावेच लागतील अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. आज त्यांचे वक्तव्य तंतोतंत खरे ठरले आहे.मुळात कुठलाही कायदा लागू करताना जनभावनेचा आदर करावा लागतो. परंतु मिळालेल्या बहुमताचा सन्मान न राखता एखाद्या हिटलर प्रमाणे देशावर शासन करायला गेलं की त्याचं काय होतं त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मागे घ्यावे लागलेले कृषी कायदे.राहुल गांधी जे जे बोलले ते ते सगळे खरे होते.

आज देशातील जनतेची मने न जाणता एकांगी पद्धतीने निर्णय घेणे सुरू आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे भाजपा सरकार हे भांडवलदार यांचे सरकार आहे. सगळे निर्णय हे अंबानी आदानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींना फायदा व्हावा या दृष्टीने घेतले जातात. देशातील रेल्वे स्टेशन, विमानतळ, विमान कंपन्या, तेल कंपन्या, खनिज उद्योग, वस्त्र उद्योग, बंदर हाताळणी, स्टील कंपन्या असे सारे उद्योगांचे खाजगीकरण वेगाने सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या पापांची पोतदी दिवसेंदिवस भरली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.