Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

दिवंगत लोकनेते “दि. बा. पाटील साहेब.” यांच्यावरील आगरी अलक
दि. बा. दैवत !!

नातूस — आज्या, कोन व्हतं दि. बा. पाटील सायेब ???
आज्या — बाला, सांगतय, आयीक…….
यक तेजोमय दिवा उरन तालुक्यांचे, रायगर जिल्यांचे, जासय गावांन परकासमान झाला. आगरी- कोली- कराडी आनं सगले समाजाचा सुर्वे नारायनुस तो !! कतीक वादला.. भुतवाला.. तुफाना.. संकटा आली आनं ज्येली. पुंन नय डगमगला.. सदा तलपला. शंबर नंबरी सोनास तो !! जवरा भट्टीन ज्येला, तवरा निखारला. आस्सल हिरा.. झार चंदनाचा !! आगे समाज्यासाटीस— जलमला… जगला… झिजला… दरवलला… चमकला !! ज्याला पाऊन कालोख पल काराचा. बंदुकिंच्या गोल्या आनं सब्दांचं बान दिशा बदलाचं. ज्याचा ऊज्येर, तेज समाज्यावं आखंड परला हाय… आनं कायम ऱ्हाईल !!
बाला, “तो आमर समाज दैवत… दि. बा. नावाचा दिवा ! देव मानूस !! सुर्वे नारायन !!!”

लेखक- अरुण दत्ताराम म्हात्रे.
जासई-उरण. *मो.- ९९८७९९२५१९.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.