Press "Enter" to skip to content

झुडपात टाकले अर्भक

एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भकाला पोत्यात भरून झुडपात टाकले

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
            

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत काल दि. 09 नोव्हेंबर 2021 रोजी 16:30 वा च्या सुमारास कर्जत तालुक्यातील मौजे वदप आदीवासीवाडीचे बाजुला पडीक जागेतील भिंतीचे बाजुला असलेल्या झाडी झुडपात पोत्यामध्ये कोणीतरी अज्ञात आई-वडील किंवा देखभाल करणा-या व्यक्तींनी अंदाजे एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भकाला मौजे वदप येथील आदीवासीवाडीचे बाजुला पडीक जागेतील भिंतीचे बाजुला असलेल्या झाडी झुडपात पोत्यामध्ये उघडयावर टाकले आणी त्याचा त्याग करुन त्या अर्भकास सोडुन दिले आहे.            

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.284/2021 भा.दं.वि.क 317 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहाय्यक फौजदार वसंत वराडे हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.