Press "Enter" to skip to content

मोफत नेत्र चिकित्सा शिबीर

कै.मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरेतर्फे मोफत नेत्र चिकित्सा व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

कै.मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरेतर्फे मोफत नेत्र चिकित्सा व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी या परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोना ( कोविड १९ ) महामारीच्या कठीण प्रसंगात आजारी रुग्णांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्या करिता अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आहे अश्यातच डोळ्यांचे आजार आणि मोतीबिंदूचा त्रास असणाऱ्या गरीब गरजूवंत रुग्णांना उपचारा करिता शहरातील मोठ्या दवाखान्यात उपचार घेणं अवघड आणि जिकरीचे झालं आहे. अश्याचतच गरीब गरजूवंतांच्यां मदती करिता सदैव मदतीचा हात पुढे करणारी संस्था कै.मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदर्श शिक्षक कौशिकजी ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत नेत्र चिकित्सेत मोठं नावं असणारं रुग्णालय आर.झुनझुनवाला आय हॉस्पिटल नवीन पनवेल,नवी मुंबई यांच्या संयोजनातून डोळ्यांचे आजार असणाऱ्या रुग्णांकरिता मोफत नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांकरिता मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच आयोजन करण्यात आले.

ह्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिरात तपासणी करण्याकरिता आणि उपचार घेण्याकरिता आजूबाजूच्या विभागातून अनेक रुग्ण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कै.मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे यांच्या वतीनं आयोजित मोफत नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला प्रमुख उपस्थित मान्यवर केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर, आवरे गावच्या सरपंच निराताई पाटील, अशोक ठाकूर सर, प्राचार्य सुभाष ठाकूर, पत्रकार राजेश भोईर,विद्याधर गावंड, अनिल घरत यांनी आपली उपस्थिती दर्शविली ! तर या कार्यक्रमाचं सूत्र संचालन महेश गावंड यांनी केलं.

हा कार्यक्रम साकार करण्यासाठी विशेष मेहनत घेतली ती आवरे गावचे शिवसेना शाखा प्रमुख सुनिल ठाकूर, उपशाखाप्रमुख, शाम गावंड, युवाअधिकारी अमित म्हात्रे, हितेंद्र म्हात्रे, अरुण थळी,नारायण पाटील, अविनाश ठाकूर,समाधान गावंड,भोलानाथ गावंड, गजानन गावंड यांनी प्रयत्न केले.

कै.मधुकर ठाकूर प्रतिष्ठान या संस्थेच्या आयोजनातून साकारलेल्या ह्या गरीब गरजूवंत नागरिकां करिता मोफत नेत्र चिकित्सा आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना हॉस्पिटल मध्ये नेण्याची, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संस्थेच्या वतीने मोफत करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे मोफत नेत्र चिकित्सा करण्या करिता व मोतीबिंदूचीं शस्त्रक्रिया करण्याकरिता ह्या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या रुग्ण आणि ग्रामस्थांचा प्रतिसाद सुद्धा तितकाच अभूतपूर्व असाच होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.