पुजूया मंगळागौर
श्रावणमासी मंगळवारी
पुजूया मंगळागौर
फुले पत्री वाहू या ग
सजवूया मंगळागौर
नैवेद्याला पुरणपोळी
डाळ-तांदुळाची खिचडी
मौन पाळून जेवू दुपारी
झिम्मा, फुगड्या खेळू रात्री
जमू साऱ्या मैत्रिणी
घेऊ उखाणे ,म्हणू गाणी
नानाविध खेळू खेळ
मजेत जाईल सारा वेळ
करू शक्तीची उपासना
सुखाची करू प्रार्थना
जागर करूनी रात्रीचा
लुटुया ठेवा आनंदाचा.
सौ.संध्या करंदीकर, नवीन पनवेल






Be First to Comment