विसर्जन बाप्पाचे
टाळ ,मृदंगाच्या गजरात
पूजा, आरती केली तालात
स्तोत्र , आवर्तनाची लगबग
सर्वच म्हणता होते सुरात
दूर्वा, फुले, हार, पत्री
आणि मोदक,खिरापत
प्रसादाची,सर्व तयारीने
मन प्रसन्न उत्साही होत
उद्या पासून यातलं
काहीच करायचे नाही
रोजची पूजा होईलच रे
पण तुझ्या उत्सवाचं नाही
ह्या विचारानेच नुसतं
मन आलयं रे भरून
भावपूर्ण निरोप घेऊन
पुढच्या वर्षी ये हं फिरून
मनोभावे केली तुझी
सेवा तन मन धन अर्पून
एकरूप होऊन केली पूजा
आरती, श्रद्धेने सारं समर्पून
एकच मागणे बाप्पा
तुझ्यापाशी मागते
मिळो सर्वांना सुखी
समृध्दी- जीवन निरामय ते..।।
वर्षा मेहेंदर्गे, नवीन पनवेल







Be First to Comment