गणेशवंदना
चौदा विद्यांचा अधिपती तू
तूच कलांचाही अधिधाता ।
विघ्ने हरिसी तू सकलांची
प्रथम वंदितो तुज मी आता ॥ ध्रु.॥
देहातीत तू, कालातीत तू
विघ्नेश्वर तू, तू सर्वेश्वर
ब्रम्हा, विष्णु, महेश तूची
शक्ती बुद्धीचा तूच ही दाता ॥१॥
सिद्धीप्रिय तू, अप्रमेय तू
व्यापून उरले तूच मनाला
तूच विकट अन् विघ्नराजही
सकल जगाचाही तू त्राता ॥२॥
© केदार जोशी, पनवेल







Be First to Comment