श्रीनिवास काजरेकर
नवीन पनवेल दि. १७ः
ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्षपठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कोविडच्या पार्श्वभूमीवर गतवर्षाप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. पनवेल परिसरातील गणेशभक्तानी आपापल्या घरातूनच या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संभेच्या अध्यक्ष दिपाली जोशी, सचीव मंजुषा भावे, प्रसाद जोशी यानी कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. खजिनदार वैशाली सरदेशपांडे यानी तंत्रसहाय्य केले.
ब्राह्मण सभेच्या वतीने प्रतिवर्षी सामुदायिक अथर्वशीर्षपठणाचा उपक्रम करण्यात येतो. त्याला नवीन पनवेल परिसरातील गणेशभक्तांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. तसेच विविध सभासदांच्या घरी आवर्तने, संगीत आरती, मंत्रपुष्प आदी कार्यक्रमही संपन्न होतात.







Be First to Comment