गौरीपूजन
गौरी पूजनाचा आज दिवस
जमू साऱ्याजणी खास
माहेरवाशीण गौर आली
हसे हळूच ती गाली
करू नैवेद्याचा थाट
पंचपक्वान्नांनी भरे ताट
विविध भाज्या,कोशिंबीरी
पुरणपोळ्या, खीर पुरी
हळदी-कुंकवाचा सोहळा
जमला मैत्रिणींचा मेळा
सुख-दुःखाचा विसर पडला
झिम्मा-फुगड्यात जीव रमला
आनंदाच्या त्या क्षणांनी
मना मिळतो विसावा
वर्षभर जपून ठेऊ
आठवणींचा हा ठेवा.
सौ. संध्या करंदीकर, नवीन पनवेल








Be First to Comment