“आई”
वाढविले पोटातनऊ महिने तू आई
चालावयाला शिकविले बोट धरून तू आई
“आई”शब्दाशी ओळख
करून दिलीस तू आई
मुक्या माझ्या प्रेमाला
वाचा प्रदान केलीस तू आई
भरवला प्रथम घास अन्नाचा तू
चाखलीअन्नाची चव प्रथम मी आई
अमृताहुनी गोड मज लागे ते
साक्षात अन्नपूर्णा तू आई
पहिल्या गुरुचा मान तूझाच असे आई
पदव्या पदविका व्यावसायिक ज्ञान आई
व्यावहारिक ज्ञानाचा मार्ग दावीला तू आई
संस्काराची अक्षय ठेव तू दिलीस आई
बांधले इमल्यावर इमले
ठेवीले सेवेकरी बहुत परी
तू केलेल्या सेवेचे ऋण अनमोल आई
तुझ्या मांडीवर डोके ठेवण्यासारखा विसावा नाही आई
केल्या कितीही यात्रा धर्मक्षेत्री
रगडले नाक, ठेविले डोके ईश्वरां चरणी
घेतले आशीर्वाद संताचे जरी
तुझ्या आशीर्वादाला तोड नाही आई
धनंजय देशमुख, नवीन पनवेल






Be First to Comment