Press "Enter" to skip to content

प्राथमिक शाळा मोठीजुई शाळेने भरविले सकस आहार प्रदर्शन

सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे |

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई या शाळेत सुयोग्य आहार काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांमध्ये प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी व त्यांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी एक अनोखा आगळावेगळा उपक्रम सकस आहार याचे प्रदर्शन भरवण्यात आले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती महिला बचत गट पालक वर्ग व अंगणवाडी ताई तसेच शिक्षक वर्गाने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये प्रदर्शनामध्ये घरी बनवलेले वेगवेगळे पदार्थ एकत्र करुन त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पदार्थांचे पूजन करून अन्न हे पूर्णब्रह्म हीच भावना मनात ठेवून विद्यार्थ्यांना चांगला संदेश देण्यासाठी हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे.असे मत ग्रुपग्रामपंचायत मोठीजुई सरपंच आशाताई भोईर यांचे यजमान हसुरामजी भोईर यांनी व्यक्त केले.

या उपक्रमात पंचायत समिती उरणच्या साधन व्यक्ती वैशाली गावंड मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, सदस्य यादव कामोठकर, सदस्या वैशाली पाटील, अंगणवाडी सेविका जयवंती पाटील,भगत मॅडम व त्यांच्या सर्व सहकारी पालकप्रतिनिधी गुलाब कोळी,महिला बचत गट प्रतिनिधी करिश्मा पाटील, मुख्याध्यापक सुभाष म्हात्रे सर,शिक्षिका रंजना म्हात्रे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी सहभागी झाले होते

अनुभवातून शोधू या विज्ञानाचे झरे अंतर्गत सुयोग्य आहार या प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शाळेचे उपक्रमशिल शिक्षक संजय होळकर , दर्शन पाटील , संदीप गावंड,शर्मिला भोईर ,यतीन म्हात्रे व श्रीम.ज्योती बामणकर यांनी विशेष मेहनत घेवून हा कार्यक्रम मोठया उत्साहात यशस्वीपणे पार पाडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक संजय होळकर यांनी मानून प्रदर्शनाची सांगता केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.