जुनी इमारत तोडून झाले एक वर्ष तरीही अद्याप नवीन कामाचा दगडही रचला नाही
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
खोपटे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खोपटे मधील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेची जुनी इमारत तोडून जवळजवळ एक वर्ष होत आला आहे. त्या जागेवर त्वरित शाळेची नवीन इमारत व्हायला पाहिजे होते मात्र त्या जागेवर अद्यापही कोणत्याही प्रकारचे काम सुरू झाले नाही . सदर प्राथमिक शाळेची ईमारत सी एस आर फंडांतून दुबई पोर्ट ( एन एस आय सी टी) हया नामक कंपनीच्या माध्यमातून बांधण्यात येणार असल्याची प्राथमिक चर्चा ग्रामपंचायत आणि शालेय शिक्षण कमिटीच्या चर्चासत्रात झाले होते. मात्र अजूनही प्राथमिक शाळेच्या इमारतीचे काम सुरू झाले नाही .

महाराष्ट्र शासनाच्या जी .आर नुसार लवकरच शाळा सुरू होणार आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आणि शिक्षकाना शिकवण्यासाठी वर्ग तर पाहिजेत . त्यामुळे महत्वाची गरज ओळखून खोपटे गावचे ग्रामस्थ आणि विद्यमान ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित म्हात्रे, रितेश ठाकूर ग्रा. पं. सदस्य,जागृती घरत ग्रा .पं . सदस्या,भावना पाटील ग्रा. पं .सदस्या, राजश्री पाटील ग्रा. पं सदस्या,करिष्मा म्हात्रे ग्रा.पं. सदस्या,शुभांगी ठाकूर ग्रा. पं . सदस्यां यांनी तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी उरण, सभापती उरण पंचायत समिती, निलम गाडे- गटविकास अधिकारी उरण यांच्याकडे लेखी अर्ज देऊन प्राथमिक शाळा खोपटे ह्या शाळेच्या इमारतीचे लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी केली आहे.

शाळा सुरु झाल्यास मुलांना कुठे बसविणार ? शिक्षक विद्यार्थ्यांना कसे शिकविणार ? विद्यार्थी किती दिवस पर्यायी जागेत शिकतील ? हा मोठा प्रश्न असून शाळेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याने लवकरात लवकर शाळेचा प्रश्न निकाली काढावा अशी लेखी मागणी पत्रव्यवहाराद्वारे विविध संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना करण्यात आल्याची माहिती उपसरपंच सुजित म्हात्रे यांनी दिली आहे.












Be First to Comment