गजानना रे गजानना
गाता गाता तव भजना
आमोद की हा वाटे मना
आनंद होई सकलजना.
सुखकर्ता तू दुःखहर्ता
आम्हा सर्वांचा तू त्राता
बुद्धीची रे तूच देवता
नमन माझे तुज एकदंता.
भाद्रपदाच्या चतुर्थ दिनी
तुझे आगमन होता सदनी
भक्तीभाव दाटतोच मनी
करीता वंदन कर जोडोनी.
लाल फूल असे पूजेला
मोदकही तुज नैवेद्याला
रुप असे सुखवी नयनाला
अर्पिताच दुर्वांची माला.
मूषकराज ही तुझ्यासवे
म्हणशी तू मागा काय हवे
तुझी मूर्ती सर्वांना भावे
पुजिती तुजला मनोभावे.
मनोकामना पूर्ण करिशी
जणू आम्हासी हेच सांगशी
नित्यनेमे येईन दरवर्षी
याच ठिकाणी याच दिवशी.
अपर्णा
भाद्रपद गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
गणपती बाप्पा मोरया !!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏








Be First to Comment