हरितालिका
केले तप पार्वतीने महादेवास पूजिले
वरी मनी ध्यानी नाम एका शिवाचे ध्याईले
चंद्रसूर्य नभी श्रेष्ठ तारका पुंजात
व्रत तसे हरितालिका तिथी तृतीया रुपात.
भ्रताराचा संकल्प पावे सिद्धीस कारण
कुमारिका पूजिताती देती एकमेकीस हे वाण.
एकचित्त एकआस शिवस्वरूप कामना
पूजा करी सखी संगे मनोवांछिली प्रार्थना
निसर्गाच्या सहवासे तपाचरणी आराधना
न जाणे पार्वती अन्य देवांचा तो महिमा
कृश झाली काया निष्ठा वाढली दिसमास
वर्षे किती उलटली होई काळजी पित्यास
शिवोहं शिवोहं नादे गौरी पूजिते शिवास
पावे सदाशिव वाट पाहे गौरीहरा ची कैलास
सौ.सुजाता खरे., नवीन पनवेल







Be First to Comment