भाद्रपद
पाठीस पाठ लावून
नित्य श्रावणा मागून
तो मास भाद्रपद येतो
त्या कोणी नभस्य म्हणतो.
रेलचेल रोज सणांची
असते लगबग ललनांची
हरतालिका नि त्या गौरी
बाप्पांची किती तयारी
ऋषिपंचमीस बैलांचा
सण हा ऋणनिर्देशाचा
पितृपक्षी पितर स्मरण
अन् जैनांचे पर्युषण
बदले सृष्टीची गरिमा
हाच तर भाद्रपद महिमा
निलिमा देशपांडे, नवीन पनवेल







Be First to Comment