आमचा जेष्ठ नागरिक संघ
ह्यो लै नाद खुळा या आमच्या जेष्ठ ना. संघाचा
कधी उघडेल बाबा दरवाजा या जेष्ठ ना. संघाचा
आमचा संघ हा सर्व जेष्टाचा मोठा आधार
कारण इथे प्रत्येकात होतो चैतण्याचा संचार
प्रत्येक सभासद एकमेकांना भेटण्या झाला आहे आतुर
इतक्या दिवसाच्या एकांताला पळवून लावू दूर
संघाच्या नुसत्या ब्रीदवाक्याने येते मनाला उभारी
एकमेकां आधार देऊन चिंता, दुःखे पळवून लावू सारी
संघाच्या मासिक सभेचा काय वर्णवा. तो थाट
वाढदिवसाला मित्रांसोबतच्या आनंदाची पाहतात वाट
वर्षभर असते नुसती धमाल अन कार्यक्रमाची रेलचेल
आनंदाच्या वर्षावात प्रत्येकजण न्हाऊन निघतो सचैल
दिंडी, भोंडला, गोपाळकाला कार्यक्रमाची न्यारीच रे खुमारी
त्या त्या रंगात रंगून जातात आमच्या संघाची पोरपोरी
गुरु वारच्या भक्तीरसात आमचा संघ रममान होतो
सकारात्मक ऊर्जेने चांगले काम करण्या ऊर्जा देतो
संघात आम्ही विसरून जातो मुलबाळ आणि भावबंध
दोस्तामध्येच रंगून जातोय रे लागून आगळा छन्द
आमचत जेष्ठ ना. संघाचा डंका. संपूर्ण महाराष्ट्रात की वाजे
अजूनही आमचाच जेष्ठ ना. संघ एक नंबरवर विराजे
. संघाची कवाडे उघडन्या पाहायला लावू नका रे वाट
सर्व गोष्टीची पूर्तता करून संघ. उघडन्या घाला की घाट
. विलास चव्हाण, नवीन पनवेल







Be First to Comment