Press "Enter" to skip to content

उरणच्या मयुर कदम याची प्रो कबड्डी लीग या स्पर्धेच्या 8 व्या हंगामासाठी निवड

“गणेश क्लब बोकडवीरा संघाच्या” मयुर कदम याला बंगळूरू बुल्स संघाने 15 लाख रुपये देऊन घेतले आपल्या संघात

सिटी बेल | उरण | सुभाष कडू |

बोकडविरा येथे राहणारा सामान्य कुटुंबातील मयुर कदम याची प्रो कबड्डी लीग या स्पर्धेच्या 8 व्या हंगामासाठी निवड झाली आहे.गणेश क्लब बोकडवीरा या स्थानिक संघा कडून खेळणाऱ्या मयूर कदम याला बंगळूरू बुल्स संघाने त्यालां 15 लाख रुपये देऊन आपल्या संघात निवड केली आहे. त्याच्या या निवडीन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघ आणि प्रो कबड्डी साठी निवड झालेला मयूर कदम हा उरण तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला आहे.

मयुर जगन्नाथ कदम हा 24 वर्षीय खेळाडू उरण माधील गणेश क्लब बोकडवीरा या स्थानिक संघा कडून कबड्डी खेळतो .त्या संघाच्या माध्यमातून त्याने अनेक कबड्डी स्पर्धात आपला उत्कृष्ट खेळ केला आहे. आपल्या कुटुंबाचे पालन करण्यासाठी सेव्हन स्टार सेक्युरीटीज मध्ये बीएमसिटी येथे कार्यरत कार्यरत असलेला हा खेळाडू चे कबड्डी या खेळावर खूप प्रेम असल्याकारणाने, बेताची नोकरी असताना देखील आपला खेळ उंचाविण्यासाठी खूप मेहनत घेत आहे.या निवडीमुळे त्याच्या मेहनतीचा चीज झालं आहे.

मयूर कदम याच्या निवडीन उरण तालुक्यातील कबड्डी खेळाडूना एक नवी उर्जा प्राप्त होणार आहे.त्यामुळे गेले कित्येक वर्ष कबड्डी चा सूर निघत असलेली उरण तालुक्यातील कबड्डी आत्ता वेगाने मैदान गाजवणार आहे हे निश्चित.मयूर च्या या निवडीनं उरण तालुक्याच नाव क्रीडा क्षेत्रात उंच झाल आहे.त्याचा गणेश क्लब बोकडवीरा संघाने व उरण करांनी आभिनंदन केले आहे.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.