गोपाळकाला
गोकुळनगरी कृष्ण खेळला
संगे गोपाळांचा मेळा
दही दूध लोणी चोरून खाता
नवा खेळ तो असा रंगला
नवा खेळ तो असा रंगला
लोण्यासाठी थर ही लागला
गोपाळांच्या मध्ये कान्हा
उंचावरती चढु लागला
उंचावरती चढु लागला
शिंकळ्याशी हात पोहोचला
लोणी चोरून खाता खाता
गोपाळांचा काला झाला
गोपाळांचा काला झाला
कृष्णकन्हैया गोड हासला
गोपिकांचा रागही सगळा
कुठल्या कोठे पळून गेला
सई मराठे, पनवेल







Be First to Comment