कृष्णसखा By City Bell on August 30, 2021 कृष्णसखानिळ्यासावळ्या आकाशातूनइथे भेटतो कृष्ण सखा ।थेंबाथेंबातून वाहतोइथेच राणा कृष्ण सखा ॥ १ ॥सकाळच्या प्रहरी पाव्यातुनधून होऊनी नांदतसे ॥दह्या दुधाच्या प्रवाहातुनीरोज भेटतो कृष्ण सखा ॥ २ ॥पडते पाऊल अडते जेव्हावाट दाखवी अनामिका ।वळणावळणा मधुनी भेटतोअसा सारथी कृष्ण सखा ॥ ३ ॥तुझी ही रूपे किती वर्णावीशब्दही पडतो कधी फिका ।असाच भेटो क्षणाक्षणालाहा गिरिधारी कृष्ण सखा ॥ ४ ॥केदार जोशी, पनवेल केदार जोशी, पनवेल Published in काव्य कट्टा City Bell More from काव्य कट्टाMore posts in काव्य कट्टा »सिटी बेल काव्य कट्टासिटी बेल काव्य कट्टासिटी बेल काव्य कट्टासिटी बेल काव्य कट्टासिटी बेल काव्य कट्टासिटी बेल काव्य कट्टासिटी बेल काव्य कट्टासिटी बेल काव्य कट्टासिटी बेल काव्य कट्टासिटी बेल काव्य कट्टा
Be First to Comment