Press "Enter" to skip to content

श्रावण झुला

श्रावण झुला

हिरव्या रंगाचा नेसली शालू
प्राजक्त निशिगंध सोनचाफा लागला डुलु,

अंबरी रंग उधळले नऊ,
सोनेरी तांबूस निळा केशरी जांभूळ
सप्तरंगी इंद्रधनु ची बांधली कमान

उंच विहार घे राघूंचा थवा
सुपारी नारळी माडाचा ताटवा

टेकल्या टेकल्या गगना
चिकू पेरू आंबा पपई
रात राणी रांनजाई सदाफुली अबोली
हिरव्या रानाची नवी नवलाई जीव वेडा,
चमेली सोनचाफा दरवळे कदंब केवडा
पेरला आभाळी गुलाल बुक्का रांगोळी
पर्वत माथांच्या रांगा ओळी

हिरव्या निळ्या, राखाडी निळी, ओसंडे धबधबा वाहतो स्वच्छंदी, दुग्धधारा जणु मोत्याची रास उपडी
पाने, फुले, धुंद पक्षी गाती गाणी

अंबरआले मिलना धावूनी, सुखावली वसुंधरा असे लाजलाजूनी
सजली धजली वाट पाहे मोर पिसारा फुलवून नाचत सुगंधाने भान हरपून जाई
अशी श्रावण सरींची नवलाई.

पुर्णिमा शिंदे आकाशवाणी निवेदिका मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.