Press "Enter" to skip to content

बाबा

बाबा

आज अचानक याद आली
बाबा तुमच्या शब्दांची
कसे असेल लेकरू माझे
विचारणार्या भावनेची

मनामधली घालमेल ती
भुलवणार्या हाकेमधली
आहे सोबत तुझ्या सांगे
थाप माझ्या पाठीवरची

आज अशी आठव आली
बाबा तुमच्या स्पर्शाची
कुठे आहेस कसा आहेस
प्रश्नार्थक त्या नजरेची

विश्वासाने पाहणार्या
खर्याखुर्या आधाराची
पुढे जा बाळा माझ्या
सांगणार्या हृदयाची

रोज आठवतो बाबा तुम्हा
इच्छा केवळ आशिषाची
नमन करतो माझ्या देवा
साथ तुमच्या अस्तित्वाची

  • श्री. स्वानंद नंदकुमार मराठे.
    पुणे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.