Press "Enter" to skip to content

आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावण
आला श्रावण श्रावण
दे सुखाचे शिंपण
स्वप्नं मनात जागता
दिसे माहेर आंगण ।।
आला श्रावण श्रावण
रुप वधूचे लेवून
तिच्या मायेच्या होतान
करी सुखाचं शिंपण ।।
आला श्रावण श्रावण
गूज नव्याचे घेवुन
भक्तीभावाला मनात
नित्य जागते करून ।।
आला श्रावण श्रावण
उरी कान्हा रुजवून
नवथर मनासी या
देत विचार कुंपण ।।
आला श्रावण श्रावण
छटा हिरव्या घेवुन
रंग उतरसे मनी
पायी माहेर रिंगण ।।

सौ.अदिती गोखले, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.