पापण्यांच्या कडांनी
पापण्यांच्या कडांनी आता
किती कठोर हे व्हावे
मनाच्या उष्ण कढाना
किती वेळ ते थोपवावे
निःशब्द कातर मनाचे
असवांचे अव्यक्त निर्झर
ढासळले बुरुज हिमतीचे
मुखवट्या ना करती जर्जर
कणखर मनसुबे पोलादी
गोठविती ही अश्रूफुलें
रंगीत मुखवट्यांची सद्दी
आभाळभर कागदी फुले
जनरीत भरण्या घडे सुखाचे
लांगुलचालनाचे पडती सडे
टिकविण्या अस्तित्व फुकाचे
बेमुर्वत गिरविती धडे
पापण्यांच्या कडांनी आता
बांध हे सैल सोडावे
कढानी उन्मुक्त झरावे अन
निरभ्र नभ हे हसावे
दिपाली जोशी, नवीन पनवेल







Be First to Comment