आला श्रावणमास
आला, आला श्रावण मास।
मनी धरा हर्ष, उल्हास।
करू पूजाअर्चा, व्रत, वैकल्य।
नका आणू मना कोरोनाचे शल्य।
म्हणतात या श्रावण महिन्यात
देव, देवता अवतरतात भूवरी।
करतील कृपा आपल्या वरी।
स्मरू त्या अद्भुत शक्ती ला।
सांगू नष्ट कराया त्या विषाणूला।
पृथ्वी वर जेव्हा माजतो हा:हाकार।
मानव रूपात देव घेतात अवतार।
आपण ही जागुया या श्रध्देला।
आनंदाने सज्ज होऊ श्रावण महिन्याचे स्वागत करण्याला।
शुभांगी कुलकर्णी
नवीन पनवेल






Be First to Comment