पुन्हा एकदा…
सादाला प्रतिसाद मिळावा
आणि नवा संवाद घडावा
अंतरातल्या सुखस्वप्नांचा
पुन्हा एकदा योग जुळावा..
गाता गाणे बहरची यावा
तालसुरांचा मेळ जमावा
आठवणींच्या सप्तस्वरांनी
पुन्हा एकदा सूर भिजावा..
काळोखाचा अंमल मिटावा
आणि केशरी साज चढावा
खोल खोल त्या अंतरातला
पुन्हा एकदा भेद सरावा..
आधारातूनी धीर मिळावा
मौन राखुनी भाव कळावा
मायेच्या त्या सुखद क्षणांचा
पुन्हा नव्याने सूर जुळावा…
©समीर खरे, पनवेल
8879737388







Be First to Comment