सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री बालाजी अमिरथलिंगा पांडियन (तामिळनाडू) यांच्या सौजन्याने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वशेणी मधील इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंतच्या ८१ मुलांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले. तर जिल्हा परिषद वशेणी शाळेसाठी दोन स्टॅन्ड फॅन देण्यात आले.
या स्कूलबॅग वाटप कार्यक्रमाचे आयोजन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने केले होते. यावेळी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यरत सदस्य डाॅक्टर रविंद्र गावंड, सतिश पाटील, मिलिंद पाटील, गणेश पाटील, पुरुषोत्तम पाटील, अनंत सदाशिव पाटील, बी.जे.म्हात्रे, मनोज गावंड, कैलास पाटील, अनंत तांडेल, त्याच प्रमाणे वशेणी शाळेचे मुख्याध्यापक अनंत अर्जून पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड, ग्रामपंचायत सदस्य गणपत ठाकूर , जे.डी म्हात्रे, महेंद्र पाटील, नरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

वशेणी शाळेतील मुलांना ही मदत मिळवून देण्यासाठी मंडळाचे सदस्य कुमार आदिनाथ नरेश पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याने त्यांचे मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्र म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन विशेष कौतुक केले.

७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी बालाजी सर यांनी केलेली ही मदत अमृता इतकीच श्रेष्ठ आहे.असे मत या वेळी कार्यवाहक मच्छिंद्र म्हात्रे
यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य प्रविण ठाकूर यांनी केले.












Be First to Comment