Press "Enter" to skip to content

श्रावणमास

श्रावणमास
लाजरा साजरा श्रावण आला
झरझर झरती श्रावणधारा
ऊन पाऊस खेळ हा रंगला
इंद्रधनुचा नभी जणू गोफ विणला

हिरवाकंच रंग लेवूनी
झाडे वेली बहरूनी आली
रत्नजडीत कंठी हार लेवूनी
सुंदर भासे ही अवनी

व्रतवैकल्ये अन् सणउत्सव
साजरे होती घराघरतून
गोडधोड पक्वांनाची मैफिल
उत्साहाला येई उधाण

बालके आनंदाने बागडती
ललना या देवदर्शना निघती
सख्यासह आपले मन रिझवती
वाटती त्या जणू उत्साहमूर्ती

ऐसा श्रावण मोहवी मना
माहेरची ओढ लावी मना
नागपंचमी,रक्षाबंधना
भाऊराया घरी येई पाहुणा

नयना पेंढारकर, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.