आला श्रावण श्रावण
आला श्रावण श्रावण
हिरवे झाले सये रान
पानाआडून हासती
रंगीबेरंगी फुले छान ..
पावसाच्या सरीमधुनी
मोती ओघळती पानावर
धरणीमाय गाली हसली
हिरवा शालू अंगी ल्याली..
आला श्रावण श्रावण
सणावाराला ग उधाण
नारी पूजिती हर्षाभराने
भोळा कर्पूरगौर तो महान
कधी आकाश ते निळेशार
दाटूनी येते गच्च काळेभोर
इंद्रधनु ही शोभते आकाशी
सप्तरंगांची उधळण करित..
वर्षा मेहेंदर्गे, नवीन पनवेल







Be First to Comment