पाऊस
भिजत होता पाऊस तुझ्या – माझ्या मिठीत
तोही कदाचित व्यक्त होत होता .
कोणी असेल प्रेयसी त्याची
म्हणून मुसळधार
एकवटल्या असतील अथांग भावना
म्हणून शांत , बरसत होता तो.
असतील काही क्षण त्यानेही ओंजळीत वेचलेले आणि मनी हलकेच बहरलेले
तेच घेऊन कदाचित ओसंडून वाहत असेल तो
दूरवर पुन्हा तिच्याकडे जाण्यासाठी .
सामावून नवा रंग पसरवला आकाशी त्याने,
बेभान होऊन तिच्यासोबत थिरकला असेल तोही,
छत्रीतून त्यानेही एकांत जाणलाय
म्हणूनच तर बरसतोय आपल्यासाठी
त्याच्या श्वासात रुतलाय तिचा प्रेम गंध
म्हणून मातीतून पसरवतोय तो
म्हणजे येईल ती तो गंध पारखून वाऱ्याचा वेगात
आणि पुन्हा एकदा नव्याने जगेल तो
बरसेल तसाच तिच्यासोबत पुन्हा एकदा
कधी मुसळधार ,कधी शांत
कधी मुसळधार ,कधी शांत.
मुग्धा माधव दातार.







Be First to Comment