Press "Enter" to skip to content

मला देव भेटला

मला देव भेटला

बंद देवळाआत मला देव भेटला,
निसर्गाची किमया बघ असं म्हटला,

थांबव थांबवरे सारं राजा,
सैरवैर झाली तुझी प्रजा ,
हसला आणि म्हटला
रस्त्याच्या कडेला उपाशी लेकरं ,वृद्ध रंजले गांजले प्राणी पाखरं ,दिसतात कारे तुला?

त्यानं विचारलं मला , पडणारी घर ढासळणारे बूरुज तोडणारी झाडं डोक्यात ईगोची खरुज. मी मोठा की तु मोठा असं काहीच नसतं ,
घोटभर पाण्याच्या तहानेला मोल असतं,
विसरलास ?
भुकेल्याला अन्न तहानलेल्यास पाणी,
म्हणून दशा झाली दीनवाणी ,
थांबव रे सर्व महाराजा
सैरभैर झाली तुझी प्रजा,

चार दोनआण्याची झिरूदे मस्ती, कोणाचीच जिंदगी नाही सस्ती
तुच महान निसर्गराजा,
उध्वस्त केली बघ प्रजा ,
शेत जमीन संपत्ती माया कसली रे संस्कृती ?
माणूस म्हणून माणसासारखा राहा अन टिकवणारे नाती,
भिंती उभ्या केल्या आता जाती पाती ,
म्हणूनच आल्या या महामारीच्या साथी ,
देवा चुकलं असेल तर अपराध घाल पोटी ,
माणूसच आम्ही धावा करतोचरे संकटी,
इतकेही करू नको तू जेरबंदी ,
दे साऱ्यांना आता तरी सुधारण्याची संधी.

पूर्णिमा शिंदे, मुबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.