Press "Enter" to skip to content

अंतर

अंतर

आकाशाला विचारा हे
अंतर काय असते ते
बरसणाऱ्या पावसाचे
अधीरतेने वाहत जाणे

सूर्याचेही किरण तसे
अलवारपणे भेटत जाणे
आकाशातील घारीचेही
घरट्याकडे हो पाहणे

ढगांच्या त्या दाटीमधून
अलवारपणे चमकणे
विजेलाही विचारा हो
कशास असे कडाडणे

शब्दांच्याही अंतराचे
गीत होय अंतऱ्याने
वाजवता मुरली मधून
भास होती गंधर्वांचे

  • स्वानंद नंदकुमार मराठे, पुणे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.