मन…
मन बाई माझं
पिसापरी हलकं
इकडे तिकडे सैरावैरा
सारखं भटकत असतं………१
कधी जातं बालपणात,
सख्यांसंगे खेळतं
चिंचा बोरं खात खात
निसर्गात रमतं…२
गुलाबी स्वप्न पाहात पाहात
तारूण्यात फुलतं
कथा-कादंबर्यात,
हळवं होऊन जातं…….३
संसाराच्या रगाड्यात
मन पिचून जातं
नवरा-मुलांचं करण्यात
स्वत:लाच विसरतं…..४
सर्व मार्गी लागले की,
जरा हुश्श होतं,
सुर्यास्ताचे सुंदर दृश्य ,
नव्यानेच निरखतं….५
नातवंडांशी खेळण्यामधे
परत लहान होतं
सुरूकुतलेल्या चेहर्यावर
तृप्तीचं हसूं फुलतं….६
शांत-समाधानी मन,
मग विरक्त होतं,
पिकलं पानं वार्यासंगे
हळूच गळून पडतं….७
तरंगत तरंगत मग
ते ,नवी कुडी शोधतं
पुन्हा ताजतवानं होऊन
नवी पहाट बघतं..८
विजया करंडे
प्रिन्सटन, अमेरिका







Be First to Comment