कविता
न विसरता दरवळणं
मनाला घट्टसं बिलगणं
श्वासात विरघळत जाणं
जपते सुरेखशी कविता…
रोज नव्याने भेटत जाणं
घर करून मनी रहाणं
न विसरता गुज सांगणं
जगते पुन्हा नवी कविता….
वाचतानाच भिडत जाणं
भिडतानाही व्यथा मांडणं
नवी धाटणी नवं सजणं
झुरते पुन्हा तीच कविता…
सुख दुःखात रोज जगणं
संवाद पुन्हा साधत जाणं
शब्दा शब्दातून विहरणं
अर्थात लपते ती… कविता
आभास रंगात नटवणं
मग संवादात जागवण
तृष्णाही फिरुनी शमवणं
नादावते तीच ती कविता….
सौ. अदिती गोखले, नवीन पनवेल







Be First to Comment