Press "Enter" to skip to content

इतिहास रचण्यास सुरूवात : मीराबाई चानूनं जिंकले सिव्हर मेडल

टोकयो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला मिळाले पहिले मेडल

सिटी बेल | टोकयो |

टोकयो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं मेडल आहे.चानूनं स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन यशस्वी उचलले. दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो यशस्वी वजन उचलल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 89 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर क्लीन अँड जर्क गटामध्ये तिने जोरदार कामगिरी करत मेडल जिंकले. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पीव्ही सिंधूनं बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले होते.त्यानंतर मीराबाईनं टोकयोमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे.

चानू यावेळी 49 किलो वजनी गटामध्ये सहभागी झाली होती. पाच वर्षांपूर्वी रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्येही माीराबाईकडून पदकाची मोठी अपेक्षा होती. त्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाईनं निराश केलं होतं. त्या स्पर्धेत तिला सहा प्रयत्नात फक्त एकच वेळी वजन उचलण्यात यश मिळाले होते.

भारताकडून करनाम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकले होते. मल्लेश्वरीनं सिडनीमध्ये 2000 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 69 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. त्यानंतर 21 वर्षांनी चानूनं भारताची या खेळामधील प्रतीक्षा समाप्त केली आहे. रियो ऑलिम्पिकनंतर जवळपास प्रत्येक स्पर्धेत चानूनं मेडल जिंकले होते. यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्सचा समावेश आहे. त्याचबरोबर एशियन चॅम्पियनशिपमध्येही चानूनं ब्रॉन्झ मेडल पटकावले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.