Press "Enter" to skip to content

पाऊस

पाऊस

अगदी सहजतेने
स्वतःला रिक्त करतो
कधी रिमझीम तर कधी
धुवांधार कोसळतो

रुप त्याचं प्रत्येक वेळी
भासतं निराळचं
चिंब भिजवणं मात्र,
त्याला जमतं सहजचं

सरीं सोबत हसत खेळत
अलवार बरसतो
शेवटी धरतीच्या कुशीत
अलगद विसावतो

पाऊसच तो,कुठे
लवकर उमजतो
आठवणींच्या भोव-यात
अडकवुनी जातो

वैशाली केतकर
नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.