Press "Enter" to skip to content

आर्त आर्जव

आर्त आर्जव

हे विठ्ठला। बा पांडुरंगा। आता तू एव्हढी दया कर
आजच्या माणसांना पहिल्या माणसासारखे कर

हे विठ्ठला। बा पांडुरांगा। निदान तू एव्हढी भीक घाल
माणसामाणसातला भेदभाव संपऊन टाक

हे विठ्ठला। बा पांडुरंगा।एव्हढी करशील का रे अनुकंपा
वरूनराजची नित्यनेमाने होऊ दे बळिराजा वर सदा कृपा

हे विठ्ठला। बा पांडुरंगा।मतलबी राजकारण्यांना चांगली बुद्धी दे
भारत देशात नांदू दे कायद्याचे राज्य आणि सुखसमृद्धी

हे विठ्ठला। बा पांडुरंगा।सर्व जगामध्ये वाढू दे सौहार्दाचे वातावरण
सर्वांना चांगली बुद्धी दे जपण्या आणि वाढविण्या पर्यावरण

हे विठ्ठला। बा पांडुरंगा। सर्वांच्या मनातील जाळून टाक मद मोह मत्सर
सर्व जगातील मतभेद मिटवून टाक नि होऊ दे आनंदाची बरसात सत्वर

हे विठ्ठला। बा पांडुरंगा।या जगांत कोणीही दुखी कष्टी कधी नसावे
सर्वानी आहे यातच समाधान मानून आनंदाने जगावे
हे विठ्ठला। बा पांडुरंगा आजच्या लेका सुनांचे आवर रे प्रताप
वृद्धाआश्रमात पाठवून वृद्ध आई वडिलांचा वाढउ नका जीवघेणा ताप
हे विठ्ठला। बा पांडुरंगा। प्रेम ध्यावे घ्यावे ही भावना सदा जागावी
सर्व जगामध्ये सदभावना आपुलकी आदर भावना वाढावी

हर विठ्ठला। बा पांडुरंगा। तू सगुण निराकार पण आता घे तू अवतार
हे जगाच्या विठूमाऊली सत्वर धाऊनी जगाचे कल्याण कर नि हो तारणहार

विलास चव्हाण, सातारा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.