मनमानसी लेख क्रमांक १२
व्हर्च्युअल भेट..
विठुमाऊलीची 🚩
विठू माऊली तू ..माऊली जगाची माऊलीत मुर्ती विठ्ठलाची..विठू माऊली च्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येतात.ही अनेक वर्षाची असलेली परंपरा यावर्षी या विषाणू संसर्गामुळे मोडली.पण मागील वर्षी प्रमाणे या वर्षीही वारीला जाता आलं नाही, तरीही अॉनलाईन दर्शन व व्हर्च्युअल वारी करता येत असली तरीही..वर्षानुवर्षे वारकरी संप्रदायातील भक्तांना विठुमाऊलीचे दर्शन घेऊन, त्याला डोळे भरून पाहिल्याशिवाय काही चैनच पडतं नाही..!!
असेच विठूरायाचे एक भक्त व वारकरी संप्रदायाचे अनुयायी जे वयाच्या सातव्या वर्षापासून वडिलांचे बोट धरून वारीला जात. महिनाभर आधीच पंढरपूरला जायच्या तयारीला लागे,पण ह्याच वारकरी आजोबाचं वय आज 80 वर्ष आहे.पण या वयात सुद्धा विठूरायाला भेटायला पायी वारीला जात होते. जसजसी आषाढी एकादशी जवळ येऊ लागली तसे सावळ्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या जीवाची घालमेल होवू लागली. तहान भुक हरपली,कुठेही लक्ष लागेना, आणि हा वारकरी विठूमाऊलीच्या भेटीसाठी आतुर झालाय. दिवस रात्र, सगळीकडे त्याला विठू माऊली दिसू लागली. आणि त्याची हि अवस्था पाहून काय आश्चर्य झाले ! काल रात्री त्याच्या स्वप्नात साक्षात विठू माऊली आले.! अरे भक्ता जशी तुला माझ्या भेटीची आस लागली आहे ,माझीही अवस्था तशीच झाली आहे. सगळी पंढरपूर नगरी तुझ्याविना सुनसान झाली आहे. निदान आज तरी मी माझ्या लेकरांना,समस्त भक्तांना डोळे भरून पाहील. लहानांपासून ते ८० वयाचे भक्त वारकरी , वृद्ध माता भगिनी, जशी माहेरी जायची ओढ लागते ,तशीच ओढ त्यांना माझ्या कडे येण्यासाठी लागते. संसाराची व मुलांची सोय लावून मोठ्या श्रद्धेने मजल दरमजल करत,पायपीट करत,पाऊस, उन , वारा झेलत,व तहानभूक विसरून मला भेटायला येतात. पण माझ्या दारी येण्यासाठी मला तुमच्या जीवाची काळजी आहे. मी तुम्हाला नक्की भेटेल, आणि तुमचे स्थान कायम माझ्या ह्रदयात आहे.व कायमच राहील..! असे म्हणत विठू माऊली ने त्याला स्वप्नात दर्शन दिले,व माझ्या समस्त लेकरांचे मी रक्षण करत आहे, पण यावर्षी विठूराया तुमच्या सदैव सोबत आहे,पण वेगवेगळ्या रुपात, तुम्हाला मी डॉक्टर ,नर्सेस, पोलीस, आर्मीचे सैनिक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कर्मचारी, महावितरण कर्मचारी, सगळे व अत्यावश्यक सेवेतील व समाजकार्य करणारे,अशा प्रत्येकाच्या रूपात मी तुम्हाला भेटत आहे.असे म्हणून ते अंतर्धान पावले.
या स्वप्नाने त्याला पहाटेच जाग आली, मुलांना, सुनेला उठूनआनंदीत होवून आधी रात्री पडलेले स्वप्न सांगितले..! मुलाने मग बाबांना मोबाईलवर अॉनलाईन व्हर्च्युअल दर्शन दिले. पण तो मनाने कधीच विठू माऊलीचे दर्शन घेऊन धन्य झाला.प्रसन्न मुद्रेने स्नान करून घरातच मनोभावे पुजा केली.विठोबा रखुमाईचे स्मरण करून.हरिपाठ सुरू केला.
युगे अठ्ठावीस परी जाहली
विटेवरी उभी विठू माऊली
धाव पाव तु विठू माऊली
तुझ्या भेटीची आस लागली
दर्शनासाठी डोळे पाणावली
यंदा पंढरी नाही दुमदुमली
नाही मृदुंग टाळ वाजली
नाही जल्लोषात वारी झाली.
विठोबा माऊली, तुकाराम..
ग्यानबा माऊली तुकाराम.. !
सौ. मानसी जोशी
खांदा कॉलनी.







Be First to Comment