वारी
पंढरीची वाट । माऊलीची आस ॥
आषाढ़ाचा मास । दर्शनाचा ॥
वारकरी भक्त । घालित रिंगण ॥
प्रेमाचे शिंपण ॥ वारी मध्ये ॥
विठूचा गजर । नाद ब्रम्हांडात ॥
आनंद मनात । भक्तांचिया ॥
भक्ताचा पूर ।चंद्रभागेतीरी ॥
भक्तिभाव ऊरी । विठ्ठलाचा ॥
समर्पित मन । कळस दर्शन ॥
परि समाधान । मना मध्ये ॥
संगीताच्या संगे । साधावा तो स्वार्थ ॥
घडो परमार्थ । सेवेतून ॥
संगीता देशपांडे, नवीन पनवेल







Be First to Comment